Shri Adinath Maharaj
Digambar Jain Mandir

A Legacy of 100+ Years

नगरसेठ हरिभाई देवकरण या घराण्यातील गांधी नाथाभाई देवकरण व हरिचंद देवकरण या दोन बंधुनी शुक्रवार पेठ, सोलापूर येथील जागा स्वस्तिश्री संवत्‌ 1903 मध्ये स्वतः खरेदी करून त्या जागेवर स्वस्तिश्री संवत्‌ 1905 माघ वद्य पंचमीच्या शुभदिनी सोमवार दि. 12 फेब्रुवारी, 1849 या दिवशी जैनधर्मातील प्रथम तीर्थकर, देवाधिदेव श्री 1008 आदिनाथ भगवान आणि गर्भगृहातील माता पद्मावती देवी सह अन्य सर्व जिनबिंबाची प्रतिष्ठापना करून श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर, सोलापूर (मोठे मंदिर) या सुंदर, भव्य, विशाल, शिखरबध्द मंदिराची मोठया वैभवाने पंचकल्याणक प्रतिष्ठा केली, निर्मिती केली. मंदिर निर्मितीसाठी समाजाकडून एक पैसा सुध्दा देणगी घेतली नाही. हरिभाई देवकरण यांनी स्वतःच्या मालकीच्या या मंदिराची वैयक्तिक, स्वतः अनेक वर्षे देखभाल केली. 

360° Virtual Mandir Tour